My story

Meet

प्रिय आत्मन ,
आत्मकला विज्ञान ध्यान शिबिराविषयी अधिक माहिती घेण्याबाबत आपण जो उत्साह दाखविला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करतो. आत्मकला ध्यान शिबीराचे कार्यक्रम नियम व अन्य माहिती देण्यापूर्वी आपल्याशी थोडेसे हितगूज करू इच्छितो.
जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवन प्रवासात मानवाच्या काही मूलभूत अपेक्षा असतात. व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक त्याला सुखदायी अनुभव अपेक्षित असतो. जेव्हा मानवी मन बुध्दीच्या फेऱ्यात अडकते तेव्हा सांसरिक व वैयक्तिक विषयात संभ्रमित होऊन त्याचे संतुलन हरवते. संशोधना अंती असे सिध्द झाले आहे की सर्वाधिक शारिरीक समस्या मानसिक असंतुलनामुळे निर्माण होतात. प्रामुख्याने नकारात्मक विचारसरणीमुळे आयुष्यात दुःख व अपयशच पदरी पडते.
सकारात्मक, आशादायी विचारसरणी ठेवा, मनाची एकाग्रता करा, मन शांत ठेवा, मन व बुध्दी समर्पित करा, आत्मनिरीक्षण, आत्मपरिक्षण करा. ध्यान - योग - प्रेम त्याग - परोपकार - चिंतन - मनन - जपजाप करा!' असे नेहमीच सांगितले जाते. त्यानुसार साधक प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे प्रयत्नशील होतो. ज्याला अनुभव होतो तो पुढे निघतो इतर मात्र मार्ग व समस्येची गुरुकिल्ली मिळूनही भरकटतात. ' सारं काही कळतं पण वळत नाही ' अशा विचारात प्रयत्न शिथील होतात. यशस्वी जीवनाच्या यात्रेची वाट अशी चुकत राहते.
आत्मिक विकास शरीरस्वास्थ्य व मानसिक स्थिरता यावर अवलंबून असतो. जीवन अधिक आनंदित व उत्साहपूर्ण करण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न असतात. शरीर स्वस्थ व निरोगी असेल तर मानसिक स्थिरता सहज उपलब्ध होऊ शकते व स्थिर मनोवृत्ती आत्मिक उन्नतीसाठी सहयोगी ठरते.
आयुष्यात येणाऱ्या विविध अनुभवातून आनंद ग्रहण करण्याची व त्यात समरस होऊन क्षणोक्षणी जीवनाचा आस्वाद घेण्याची कला साधनेमुळे साध्य होऊ शकते.
आपल्या अंतरी असलेल्या श्री.शंकर महाराजांस माझे प्रणाम !

आपला मित्र
*मैत्रेय*

Courses

COMING SOON

CHECK BACK SOON FOR THE NEW & IMPROVED SITE

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy